( खेड / इक्बाल जमादार )
दापोलीत रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मे महिन्यात पाण्याच्या पाईप लाईनसाठी रस्त्याच्या मधून खोदण्यात आलेले चर अद्यापही न बुजवल्याने चिखलात गाडी फासण्याचे प्रकार वाढले आहेत. दुचाकीस्वार यामध्ये घसरून पडत आहेत. लोकप्रतिनिधीं प्रशासनाला याचे काहीच देणे – घेणे नाही. जीव मात्र जाताहेत सर्वसामान्य जनतेचे. याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासन आणि खुर्च्या उबवणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर बेछूट आरोप केले आहेत.
कोकंबाआळी येथील नगरसेविका सौ. कृपा घाग यांनी मुख्यधिकाऱ्याना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटल आहे झरीआळी प्रांत ऑफिस समोर नगर पंचायतीकडून पाण्याच्या लाईन साठी चर खोदण्यात आला आहे. तो अद्यापही बुजवलेला नाही. पावसामुळे या रस्त्याची वाट लागली आहे. या चरामध्ये वाहने अडकून पडत आहेत. पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. वाहने अडकून मोठा अपघात झाल्यास याला नगरपंचायत जबाबदार असेल असे पत्रात म्हंटले आहे.