( इक्बाल जमादार )
तालुक्यातील जालगाव येथे घराला आग लागून घर जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दापोली पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोज भांबीड यांचे घर असल्याचे समजते.
भांबीड यांच्या घराला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत घरातील धान्य, रोख रक्कम, दागिने, महत्वाची सर्व कागदपत्रे, कपडे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. आग लागल्याचे कळताच मनोज भांबीड यांनी तातडीने घरातील सर्वांना बाहेर काढले. यामुळे जीवितहानी टळली. ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र घर जळून खाक झाले.