(इक्बाल जमादार /खेड)
दापोली तालुक्यातील टांगर येथील रहिवासी अनवरी खलील निरबाडकर यांच्या घराला आग लागून घर बेचिराख झाले आहे. तर घरातील सामनासह 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
दरम्यान ही माहिती टांगर ग्रामपंचायत सदस्य सईद कोंडेकर व मेहबूब कोंडेकर यांनी दापोली नगर पंचायतीकडे अग्निशमन दलाची मागणी केली. त्यानंतर दोन तासाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी आज सकाळी जावून पंचनामा केला. यामध्ये 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. एन पावसाच्या तोंडावर घर बेचिराख झाल्याने निरबाडकर कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. शासनाने वेळी याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.