(दापोली / प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील वाकवली येथील येथील वृध्दाचा मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचारादम्यान मृत्यू झाल्याची नोंद दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. मनोहर गोविंद कान्हेकर (64, वाकवली, दापोली) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर कान्हेकर यांना 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा. दरम्याने घरात अर्धांगवायुचा झटका आला. घरच्यांनी त्यांना उपचारासाठी दापोली येथील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्यानंतर त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात 19 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.35 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे