(खेड)
दापोली तालुक्यातील मुरुड साई रिसॉर्ट प्रकरणी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. साई रिसॉर्टसह अन्य काही प्रकरणात बिनशेती परवानगी नियम धाब्यावर बसवून दिल्याचा दोषारोप जयराम देशपांडे यांच्यावर ठेवला आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट व अन्य काही प्रकरणांत खोट्या व बेकायदेशीर पद्धतीने ना-विकास क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी दिल्या प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी ३० मार्च रोजी अटक केली होती.
या प्रकरणी दापोलीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी दापोली पोलीसात ८ नोव्हेंबर २०२२ ला तक्रार दाखल केली होती. दरम्यान जयराम देशपांडे यांना ईडीने यापूर्वी अटक केली होती. दापोली पोलिसांनी गुरुवारी त्यांना खेड कोर्टात हजर केले असता त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र पुढील तपासासाठी ईडीने त्यांची मागणी केल्यामुळे पुन्हा ते अलिबाग ईडीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.