(तिरुवनंतपुरम)
दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा नायर हिचा मृतदेह तिरुवनंतपुरम मधील करमना थाली तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यावेळी तिची आई आणि बहीण घरात होत्या. काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. मृत्यूपूर्वी तीने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. तिच्या मृत्यूचे वृत्त ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अपर्णा ही अवघ्या ३१ वर्षांची होती. स्थानिक पोलिसांनी मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तिच्या पश्चात पती संजीत आणि २ मुली कृतिका आणि तराया असा परिवार आहे. मृत्यूच्या काही तास आधीच अपर्णाने सोशल मीडियावरून आपल्या मुलीचे व्हिडिओ शेअर केले होते. महिलांना आयुष्यात किती अडचणींचा सामना करावा लागतो हे तिने व्हिडिओत सांगितले होते. अपर्णाने अनेक मल्याळम चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात काम केले आहे.
मृत्यूच्या काही तास आधीच अपर्णानं सोशल मीडियावरून आपल्या मुलीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. एक व्हिडिओ कोलाजही शेअर केला होता. त्या व्हिडिओला तिनं स्वतःचा आवाज दिला होता. महिलांना आयुष्यात किती अडचणींचा सामना करावा लागतो हे तिनं व्हिडिओतून सांगितलं होतं.