कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) ने अटक केली आहे. दाऊदच्या डी कंपनीसाठी हवालाच्या माध्यमातून पैशांची देवाण घेवाण करत सलीम फ्रूट असल्याचा याच्यावर एनआयएचा संशय आहे. विशेष न्यायालयापुढे हजर केले असता फ्रूट याला १७ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई सेंट्रलमधील अरब लेन भागातून सलीम फूटला अटक करण्यात आली, तस्करी, अमली पदार्थांची विक्री, मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेऊन त्यांचे व्यवहार करणे, मनी लाँड्रिंग या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे आणि तो निधी लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायद्यासारख्या संघटनांना पुरवणे असे आरोप सलीम फ्रूटवर लावण्यात आले आहेत. सलीमच्या विरोधात एनआयएकडे ५ बांधकाम व्यावसायिकांनी तक्रार केली होती. एनआयएच्या तपासात सलीमच्या घरात अनेक लोकांच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. याबरोबरच लाखो रुपयांच्या परदेशी तस्करीच्या सिगारेट देखील सापडल्या आहेत.
सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे. छोटा शकीलचा साडू आहे. छोटा शकीलच्या नावे खंडणी गोळा करत असल्याचा आरोप देखील सलीम फ्रूट याच्यावर आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा देखील सलीम फ्रूट हा निकटवर्तीय होता. हसीना पारकरसाठी मालमत्ता व्यवहारांमध्ये सेटलमेंट करण्यासाठी फ्रूट मदत करायचा. सलीम फ्रूटवर अनेक गुन्हे दाखल आहेत दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्यावरून त्याला २००६ मध्येही अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला होता. छोटा शकीलच्या पाकिस्तानच्या घरी सलीम तीन ते चार वेळा गेल्याची देखील माहिती आहे. पीएमएलए न्यायालयाने याआधी सलीम फ्रूटचा जबाब देखील नोंदवला आहे. आता एनआयएनने त्याला अटक केल्यानंतर दाऊदच्या डी कंपनीला मोठा धक्का बसणार आहे.