नाशिक पदवीधर मतदारसंघात दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला कायमचा रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सत्यजीत तांबे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे तर्क लावले जात आहे. याला विशेष कारण आहे सत्यजीत तांबे यांनी केलेले ट्विट. सत्यजीत तांबे यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
नजरेत सदा नवी दिशा असावी ।घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 14, 2023
यावर सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, नाशिकमधून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो आहे,त्यामुळे अपक्षच राहणार. त्याचबरोबर मी अजून काँग्रेस सोडली नाही अन् अन्य पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही.
सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी… घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी…” सत्यजीत तांबे यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.