(मुंबई)
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्या सेल्फी प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पृथ्वी शॉबरोबर केलेल्या कथित गैरवर्तन आणि गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केल्याप्रकरणी सपना गिलआणि तीन आरोपींना मुंबईतील एका स्थानिक कोर्टाने जामिन मंजूर केला आहे. जामिनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉवर आरोप करायला सुरुवात केली आहे. तिने पृथ्वी शॉविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच सपनाने पृथ्वी शॉवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत.
संपूर्ण घटनाक्रम सांगत सपना गिल म्हणाली, आम्ही पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांना विमानतळावर थांबवण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी आणि त्याच्या मित्राने जमावाला बोलावून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते आक्रमक आणि मद्यधुंद होते. त्यांनी आमची माफी देखील मागितली. पण 16 फेब्रुवारीला मला कळले की माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, म्हणून मीही 20 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली असे सपना गिलने सांगितले.
We tried to stop them at Airport. Prithvi & his friend called the crowd and tried to run. They were aggressive and drunk. They apologized to us. But on Feb 16, I got to know that FIR has been filed against me, so I also submitted a complaint on Feb 20: Sapna Gill pic.twitter.com/c61Jyz5GgF
— ANI (@ANI) February 21, 2023
तसेच गंभीर आरोप करताना तिने म्हटले, “मी तिथे जाऊन त्यांना थांबवले. माझ्या मित्राने पुरावा दाखवण्यासाठी व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी मला बेसबॉल बॅटने मारहाण केली. एक किंवा दोन लोकांनी मला मारले आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला कानाखाली मारली.”
Hustle video of #Cricketer #Prithvishaw & #influencer #Sapnagill outside Barrel mansion club in vile parle east #Mumbai, it is said that related to click photo with cricketer later whole fight started. @PrithviShaw @MumbaiPolice @DevenBhartiIPS @CPMumbaiPolice @BCCI pic.twitter.com/6LIpiWGkKg
— Mohsin shaikh 🇮🇳 (@mohsinofficail) February 16, 2023