काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांनी छापेमारीत सापडलेल्या 350 कोटींहून अधिक रोकड प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा माझा पैसा नाही आणि काँग्रेसचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. आयकर विभागाच्या (आयटी) छाप्याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, जप्त करण्यात आलेल्या पैशांमध्ये काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाचा पैसा नाही. त्यांची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पैशाशी माझा काहीही संबंध नाही, असे धीरज साहू यांनी सांगितले. हा माझ्या कुटुंबाचा पैसा आहे. आमचं कुटुंब खूप मोठं आहे त्यामुळे हा पैसा त्यांचाच आहे. हा पैसा बेकायदेशीर असल्याचे प्राप्तिकरच्या बाजूने अद्याप सांगण्यात आलेले नाही. अशा स्थितीत या पैशाबाबत काहीही सांगणे घाईचे ठरेल.
आयटीने धीरज साहू यांच्या रांची येथील निवासस्थानावर त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशातील दारू कंपनीविरुद्ध कारवाईचा एक भाग म्हणून छापा टाकला होता. ज्या ठिकाणी आयटीने छापा टाकला ते साहू यांचे संयुक्त कुटुंब निवासस्थान आहे. यामध्ये आयटीने 350 कोटींहून अधिक रक्कम वसूल केली आहे. आयकर विभागाने भुवनेश्वर मुख्यालय असलेल्या बुद्धिस्ट डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) कंपनीवर हा छापा टाकला होता. कंपनीच्या कथित करचुकवेगिरीप्रकरणी आयटीने कारवाई सुरू केली होती. या कंपनीचे प्रवर्तक साहू यांचे कुटुंब आहे.
काय म्हणाले धीरज साहू?
धीरज साहू म्हणाले, “आज जे काही घडत आहे ते मला दु:खी करते. जप्त केलेले पैसे माझ्या फर्मचे आहेत हे मी मान्य करू शकतो. जी रोकड जप्त करण्यात आली आहे ती माझ्या दारू फर्मची आहे. ते पैसे माझे नाहीत, माझ्या कुटुंबाचे आहेत. आणि इतर संबंधित कंपन्याचे. IT ने नुकताच छापा टाकला आहे. मी सर्व गोष्टींचा हिशेब देईन.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या छापेमारीवर प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर म्हटले होते की, “देशवासीयांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या नेत्यांचे प्रामाणिकपणाचे ‘भाषण’ ऐकावे…” जनतेकडून जे काही लुटले गेले आहे, त्याचा एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची हमी आहे.”
#WATCH दिल्ली | I-T छापे और उनसे जुड़े परिसरों से सैकड़ों करोड़ रुपये नकद की बरामदगी पर कांग्रेस सांसद धीरज प्रसाद साहू की पहली प्रतिक्रिया आई।
उन्होंने कहा, "…आज जो हो रहा है वह मुझे दुखी करता है। मैं स्वीकार कर सकता हूं कि जो पैसा बरामद किया गया है वह मेरी फर्म का है… जो… pic.twitter.com/Q4yJO9nm8O
— ANI_HindiNews (@AHindinews) December 15, 2023