(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तुरळ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सौ. एकता यशवंत देसाई ग्रामपंचायत सदस्य पदावर बिनविरोध निवडून आल्या आहेत. याबद्दल ग्रामपंचायत तर्फे ग्रामसभेत सौ. देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राजेंद्र सुर्वे, माजी सभापती संगमेश्वर देवरुखचे सभापती कृष्णाजी हरेकर, क्राईम पोलीस तपास रिपोर्टर रमेश डिके, नवनिर्वाचित सरपंच सहदेव सुवरे, माजी सरपंच अरविंद जाधव, गणपत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.