(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील तुरळ गावांमधील धोंगडवाडी येथील श्री चंद्रकांत गोविंद देसाई यांचे चिरंजीव पराग चंद्रकांत देसाई हा तरुण सैन्य दलात भरती झाल्याने तुरळ गावाच्या वतीने तुरळच्या सीमेवर ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.
तुरळ धोंगडवाडीमधील चंद्रकांत देसाई हे शेतकरी आहेत. प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केले. माजी सरपंच अरविंद जाधव यांनी योग्य असे मार्गदर्शन करून त्याला आई-वडिलांच्या इच्छेनुसार आर्मीमध्ये जाण्यास प्रवृत्त केले. तसेच पराग याला वाडीतील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले होते. वडिलांचे स्वप्न होते की, मुलाने सैन्य दलात भरती व्हावं मात्र आज प्रत्यक्षात वडिलांचे स्वप्न साकार झाले. परागने कुटुंबाची इच्छा पूर्ण केली. खडतर परिश्रम करून पराग सैन्य दलात भरती झाला आहे. अनेकांच्या डोळ्यात आनंदअश्रू येण्याचा हा क्षण होता. यामुळे विविध स्तरावरून परागचे कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमाला आर डी सी.सी बँक संचालक राजेंद्र सुर्वे. तुरळचे सरपंच सहदेव सुवरे,माजी सरपंच अरविंद जाधव,माजी सभापती कृष्णा हरेकर, उपसरपंच अनंत पाचकुडे, कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र हरेकर, सिद्धार्थ मोहिते, सौ अपर्णा जाधव ,सौ एकता देसाई शाखाप्रमुख शांताराम आदावडे, कडवई तुरळ चिखली रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी, धोंगडवाडीतील गावकर संतोष जाधव,कारभारी वसंत देसाई अध्यक्ष चंद्रकांत देसाई, सर्व धोंगडवाडीतील ग्रामस्थ महिला मंडळ तुरळ गावातील ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.