(नवी दिल्ली)
आपण पुरुषांच्या ओठाच्या वरती मिशी पाहिली आहे. पण अशीच मिशी एखाद्या स्त्रीच्या ओठावर असेल अस स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. पण हे खरं आहे. ब्रिटन मध्ये असलेल्या भारतीय वंशाच्या एका स्त्रीच्या ओठावर मिश्या आलेल्या आहेत. आणि ती अभिमानाने मिरवते. हे विशेष!
ब्रिटनमध्ये जन्मलेली हरनाम कौर मुळची भारतीय शिख धर्मातील आहे. शिख धर्मिय पुरुष आपल्या चेहऱ्यावरील दाढी-मिशा आणि डोक्यावरील केस कधीही कापत नाहीत. त्यामुळे त्यांची जगभरात स्वतंत्र अशी ओळख आहे, पण हेच शिख स्त्रियांच्या बाबतीत मात्र शक्य नाही.
केरळच्या कन्नूरमधील 35 वर्षांची शायजा जिला पुरुषांप्रमाणे मिशी आहे. आता महिलेला मिशी म्हटली की तिच्यावर हसणं, तिची चेष्टा करणं, तिला ट्रोल करणं आलंच. पण शायजाला याचा काहीच फरक पडत नाही. तिला तिची मिशी इतकी आवडते की तिला कोरोना काळात मास्कही घालायला आवडत नव्हतं कारण तिचा चेहरा झाकला जावून मिशी लपली जात होती.
स्त्री सौंदर्याच्या व्याख्येमध्ये दाढी-मिशा बसतच नाहीत. हरनामने मात्र चेहऱ्यावर उगवणारी दाढी आणि मिशी खुशाल वाढवून स्वतःची एक स्वतंत्र अशी ओळख बनविली. या शारीरिक वैगुण्यावर मात करून ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमावून आहे.