(खेड/ भरत निकम)
तिसंगी पिंपळवाडी येथील गावठी हातभट्टी दारुधंद्यावर पोलिसांनी धाड टाकून ३८ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत रोशन सुभाष भोसले (४०) याच्यावर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील तिसंगी पिंपळवाडी येथे रोशन भोसले हा गावठी हातभट्टी गाळून उत्पादन आणि विक्री करत होता. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने तिसंगी येथे धाड टाकली आहे. या कारवाईत ३१ हजार ५०० किंमतीचे १ हजार ५०० लीटरचे रसायन, ७ हजार किंमतीची ७५० लीटर क्षमतेची लोखंडी टाकी, असा एकूण ३८ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल पोलिस पथकाने हस्तगत केला.
या प्रकरणी रोशन याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(फ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईची फिर्याद पोलिस शिपाई राहूल कोरे यांनी दिली होती.