(रत्नागिरी / जिमाका)
तालुका वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी, चिपळूण यांच्यातर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या क्रिकेट स्पर्धांचे पवन तलाव मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अंतिम लढत चिपळूण “अ” संघ विरूध्द दापोली “अ” संघ यांच्यामध्ये अतिशय निर्णायक व चुरशीची झाली. या अटीतटीच्या सामन्यात चिपळूण “अ” संघ विजेता ठरला. या स्पर्धेमध्ये एकूण १६ संघानी सहभाग घेतलेला होता.
या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश, चिपळूण डॉ. अनिता नेवसे, व दिवाणी न्यायाधीश पी आर कुलकर्णी चिपळूण यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड नितिन सावंत व उपाध्यक्ष अॕड. नयना पवार, ज्येष्ठ विधीज्ञ अॕड. जे.के. रेळेकर, अॕड. डी.एस. दळी, अॕड. श्री. व्ही. एस. शिगवण, अॕड.एन.एस. केळकर, अॕड.एन.जी.लाड, श्री. एम.एस. यादव, अॕड. श्री. केतकर, अॕड. दलवाई, अॕड. आवले, अॕड.कांबळी, अॕड.तावडे, अॕड. चिमणे व इतर वकील वर्ग उपस्थित होता.
या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक चिपळूण “ब” संघ व चतुर्थ क्रमांक खेड “अ” संघाने पटकावला. सामन्यामध्ये
विजयी चिपळूण “अ” संघ यांना करंडक जिल्हा व सत्र न्यायाधीश, चिपळूण डॉ. मा. डॉ. अनिता नेवसे, यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत मालिकावीर अॕड. योगेश दांडेकर, उत्कृष्ट गोलंदाज श्री गोरख शिर्के, उत्कृष्ट फलंदाज म्हणून अॕड. रोहन बापट यांची निवड करण्यात आली
या कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी संघातील उपस्थित खेळाडूंचे कौतुक, क्रिकेटवर उत्कृष्ट कविता सादर करून केले. क्रिकेटच्या खेळाचे उत्कृष्ट समालोचन अॕड. श्री. जयरत्न कदम व अमित वरवडेकर यांनी केले. या स्पर्धेसाठी पवन तलाव मैदानावर वकिल वर्ग, न्यायालयीन कर्मचारी व प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे आभार मानून अॕड नितिन सांवत यांनी आभार प्रदर्शन केले.