चिपळूण तालुक्यामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव हे अतिशय उत्तम काम करीत असून सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहेत ,युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आहेत संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात व शहरात पक्ष वाढीसाठी ते मेहनत घेत आहेत आज चिपळूण मध्ये पक्ष वाढताना जो दिसतोय त्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नामुळे २१ ग्रामपंचायत सदस्य पहिल्यांदा निवडून आले असे असताना जिल्हाध्यक्ष विजय भोसले व अशोक जाधव यांना आम्हाला सांगायचे आहे कि, उगाच मूठभर लोकांच्या सांगण्यावरून चिपळूण काँग्रेस संघटनेत ढवळाढवळ करून गटबाजीला प्रोत्साहन देवू नका. आज पक्षाची स्थिती तालुक्यात मजबूत होत असताना असलेले उद्योग थांबले नाही तर यापुढे चिपळूणात चोख उत्तर मिळेल. त्यामुळे यापुढे असले उद्योग बंद करावेत व प्रदेशकडे खोट्या तक्रारी करणे बंद करा असा इशारा रुपेश आवले यांनी दिला आहे