(चंद्रपूर)
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील पर्यटन शुल्क वाढविण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला आहे. १ जुलैपासून या शुल्कात १ हजार रुपये वाढ केली आहे.
ताडोबा व्यवस्थापन १ जुलैपासून जिप्सीमध्ये ‘सीट शेअरिंग` सुरू करणार आहे. यासाठी एका प्रौढ व्यक्तीला १,५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सिंगल बेंचची किंमत ४,००० रुपये करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन प्रौढ आणि मुले असे तीन व्यक्ती अबसू शकतील.
आठवड्याच्या दिवशी एकाच सफारीची किंमत ५,१२५ रुपये असेल, तर शनिवार आणि रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी ६,१२५ रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. यामध्ये १,७०० रुपये प्रवेश शुल्क आहे. २,७०० रुपये जिप्सी, तर ६०० रुपये गाईड शुल्काचा समावेश असेल.