मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे ट्रक-इर्टिका यांच्यात झालेल्या अपघात 6 जण जखमी झाले होते. या अपघातात इर्टिकाला ठोकून ट्रक दरीत कोसळला होता. सुदैवाने नदीत पडण्यापासून वाचल्याने जिवीतहानी टळली होती. परंतु इर्टिकाला ठोकून ट्रकचालक रात्री फरार झाला होता. या ट्रक चालकाचा संगमेश्वर पोलिसांनी शोध घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इर्टिका चालक प्रशांत शिंदे नातेवाईकांसह तळेकांटे येथे जात असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या ट्रकने इर्टिकाला जोरदार धडक दिली. या धडकेत सुरेश रघुनाथ बने, स्नेहा बने, सुहास सावंत, अश्विनी विचारे, अनिकेत विचारे, प्रकाश झोरे असे सहा जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक शाहीद राजा खान (41, उत्तरप्रदेश) हा फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !