(रत्नागिरी)
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या अनुषंगाने काल मौजे तरवळ येथे पौष्टिक तृणधान्य जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी नाचणी,ज्वारी,बाजरी,वरी इ. पीक क्षेत्र व उत्पादन वाढ, आहारातील महत्व, त्या पासून बनवले जाणारे खाद्य पदार्थ, तसेच कृषी विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी मंडल कृषि अधिकारी विनायक अवेरे, कृषि पर्यवेक्षक सुनिल कुरंगळ,सुषमा कदम, कृषि सहाय्यक रुपाली वायाळ, गावकर भिकाजी कुळ्ये , ग्रा पं सदस्य रविन्द्र कुळ्ये, महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.