(पाली / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पाली यांना आविज पब्लिकेशनच्या वतीने पतसंस्था क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी केल्याने राज्यस्तरीय बँको ब्लु रिबन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तक्षशिला पतसंस्थेने आर्थिकदृष्टय़ा उत्तम कामगिरी केल्याबद्दल ० ते १० कोटी रुपये ठेव विभागात संस्थेला राज्यस्तरीय बँको ब्लु रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा महाबळेश्वर येथील एव्हरशाईन रिसॉर्ट येथे झाला असून, यावेळी बँको सहकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये या पुरस्कारांचे वितरण पुरस्कार बॅंकोचे सर्वेसर्वा अविनाश शिंत्रे व अशोक नाईक तसेच प्रमुख पाहुणे ठाणे जिल्हा जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष केशव सावंत, संचालक दत्ताराम घडशी, रमेश कांबळे, पराग पालकर, दिलिप रसाळ, सौ.वैभवी सावंत, सौ.स्नेहा गराटे, सचिव प्रवीण गुरव तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या सभासदांची विश्वासार्हता या पुरस्काराने आणखी दृढ झाली आहे. संस्थेचे वाढते सभासद, भागभांडवल, ठेवी, गुंतवणूक, कर्जे, खेळते भांडवल यामध्ये झालेली भरघोस वाढ, सहकार खात्याचे सी.डी.रेशो, सी.आर. आर, ऐस.ऐल. आर. चे आदर्श प्रमाण संस्थेने वेळोवेळी राखलेले आहे. सातत्याने ऑडिट वर्ग “अ” कायम ठेवला आहे. नुकताच संस्थेला महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. संस्थेने चालू वर्षामध्ये प्रधान कार्यालय व्यतिरिक्त संस्थेच्या २ नवीन शाखांना मंजुरी मिळाली आहे. संस्थेने अत्याधुनिक सोयीसुविधा आर टी जी ऐस.,ऐस.एम एस. बँकींग कोअरबँकींग, क्युआरकोड व्दारे व्यवहार व एटीएम सुविधा ग्राहकांच्या सेवेत दिल्या आहेत.
संस्था जनमानसातील पत राखण्यात यशस्वी झाली आहे. या पुरस्करासाठी संस्थेवर सामाजिक सहकार क्षेत्रातून अभिनंदाचा वर्षाव होत आहे. उद्योजक रवींद्र सामंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, पाली गावचे माजी सरपंच रामभाऊ गराटे यांनी संस्थेत भेट देऊन संस्था अध्यक्ष नितीन रामा कांबळे यांचे अभिनंदन केले व संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो – बॅंको ब्लू रिबिन पुरस्कार तक्षशिला पतसंस्थेला प्रदान करताना मान्यवर व संस्था अध्यक्ष नितीन कांबळे व सचिव प्रविण गुरव व संचालक.