(पुणे)
ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला. त्यामध्ये ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर दोषी आढळले असून, त्यांच्यासमवेत अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते हेसुद्धा दोषी आढळले आहे. या दोन्ही वरिष्ठ अधिकारी डॉक्टरांचे निलंब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्य सरकारला वेठीस धरले होते. यामध्ये सुषमा अंधारे यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. दरम्यान राज्य सरकारने या सर्व प्रकणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने संपूर्ण चौकशी करून शुक्रवारी त्यांचा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. यामध्ये ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते हे दोषी आढळल्याची माहिती समोर आली. आता संजीव ठाकूर यांची आता विभागीय समिती मार्फत चौकशी होणार असल्याचीही माहिती आहे.
आधीच्या डीनचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नियुक्ती
संजीव ठाकूर यांच्यावर शुक्रवारी झालेल्या कारवाईनंतर त्यांच्याबाबतील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ.विनायक काळे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याधीच त्यांची त्यांची ससून रुग्णालयाच्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काळे यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. मॅट कोर्टाने संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली. त्यानंतर आता हायकोर्टानेदेखील तसाच निर्णय दिला आहे. त्यामुळे संजीव ठाकूर यांचं डीन पदाची खुर्ची कायदेशीररित्या आधीच गेली आहे. त्यानंतर आता त्यांचं सरकारकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांना दणका देत त्यांची नियुक्ती रद्द केली आहे.