(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील डोर्ले येथे संजय हरिश्चंद्र हळदणकर (४२, रा. दाभिळ आंबेरे रत्नागिरी) यांना किरकोळ कारणातून चिव्याच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. संजय हळदणकर यांनी मारहाण प्रकरणी संशयितांविरूद्ध पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अभय मंगेश हळदणकर, प्रकाश शंकर बिर्जे, संतोष बोरकर व निखिल सूचित हळदणकर (सर्व रा. गणेशमळी दाभिळआंबेरे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, संजय हळदणकर व संशयित आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास डोर्ले गणेशमळी बस स्टॉप येथे पुन्हा वाद उफाळला. यावेळी संशयित , आरोपींनी चिव्याच्या काठीने संजय हळदणकर यांना बेदम मारहाण केली, अशी तक्रार संजय यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरूद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल केला. याबाबत पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.