(खेड/ इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील संगलट गावचे सुपुत्र आणि मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यवसायिक मझहर उमर नाडकर यांची कन्या डॉ. फलहा मझहर नाडकर हिने एमबीबीएस परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केली असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. फलहा नाडकर हिला लहानपणापासून शिक्षणाची ओढ असल्याने तिला डॉक्टर व्हायचे होते. कठोर मेहनत घेऊन तिने हे यश मिळविले असून आपल्या यशामध्ये आपल्या आई- वडिलांचे मोठे योगदान असल्याचे डॉ. फलहा हिने सांगितले. तिच्या यशाबद्दल संगलट गावासह तालुक्यातून तिच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी उपसरपंच व ज्येष्ठ पत्रकार इक्बाल जमादार, बशीरभाई नाडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.