(चिपळूण)
महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने १५ जून या शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभी चिपळूणमध्ये विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या दिवशी पू.प्रा केंद्रीय शाळा वालोपे नं १, जिद्द मतिमंद मुलांची शाळा, वडार कॉलनी जि प शाळा, पेढे तसेच पेढे कोष्टेवाडी जि प शाळा, परशुराम शाळा नं १ आदी शाळांमध्ये १५४ विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शाळांमधील गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी शाळेत जाऊन साहित्य वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी हातात वह्या, पेन आणि कंपास मिळाल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला. यावेळी शिक्षकांनी, पालकांनी तसेच गावातील नागरिकांनी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानले .
महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने नेहमीच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून चिपळूणमध्ये विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.