(चिपळूण)
‘डेरवण यूथ गेम्स २०२३’ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाला रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्याहस्ते विविध खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी श्री विठ्ठलराव जोशी चँरीटीज ट्रस्ट च्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन एसव्हिजेसिटीओ क्रिडासंकुलाची पहाणी केली.
याठिकाणी असलेले बँडमिंटन कोर्ट, रायफल शुटींग, टेबल टेनिस, जिमनँस्ट, बास्केटबॉल, योगासन या सारख्या खेळासाठी असलेले इनडोअर स्टेडियम तसेच स्विमिंगसाठी असलेले स्विमींग पूल, फुटबॉल स्टेडियम आणि धावपट्टू साठी असलेला सिथेटीक ट्रँक या गोष्टी कोकणात ते सुद्धा डेरवण सारख्या ग्रामीण भागात संस्थेने उपलब्ध करुन दिल्या आहेत. ते खरोखरच कौतुकास्पद आहे. लहान वयात मुलांना या ठिकाणी विविध खेळ खेळण्याची संधी मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी मुलं खेळण्याच्या उद्देशाने येतात. हे माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या हस्ते योगासन स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त विकासराव वालावलकर, सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, व्यवस्थापन कमिटी मेंबर अजित गालवणकर, खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.