( रत्नागिरी )
पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांचा महिला पालकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका आदरणीय स्वरूपा सामंत तथा सामंत काकी यांची प्रेरणा आणि शुभाशीर्वाद लाभले. सर्वप्रथम पाककला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.स्वप्ना संदीप करे मॅडम, मराठा मंदिर हायस्कूल पाली च्या मुख्याध्यापिका श्रीम. प्रियदर्शनी रावराणे, मराठा मंदिर हायस्कूल पालीच्या पर्यवेक्षिका श्रीम. प्रज्ञा दळी उपस्थित होत्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा मंदिर हायस्कूल, पाली च्या मुख्याध्यापिका श्रीम. प्रियदर्शनी रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरच्या स्पर्धेचे परीक्षण श्रीम. रावराणे आणि मराठा मंदिर हायस्कूल च्या पर्यवेक्षिका श्रीम. प्रज्ञा दळी यांनी केले. यानंतर महिला पालकांसाठी आयोजित हस्तकला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महिला पालकांनी स्वहस्ते तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
सदरच्या स्पर्धेचे परीक्षण श्रीम. रावराणे आणि मराठा मंदिर हायस्कूल च्या पर्यवेक्षिका श्रीम. प्रज्ञा दळी यांनी केले. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. स्वप्ना संदीप करे यांचे उद्बोधनपर मार्गदर्शन झाले. डॉ. करे यांनी सर्व महिला पालक व विद्यार्थिनी यांच्याशी हितगुज साधले. त्यांना असणाऱ्या समस्यांविषयी मैत्रीपूर्ण संभाषणातून त्यांना बोलते केले. यानंतर महिला पालकांसाठी आयोजित वैयक्तिक नृत्य स्पर्धा झाली. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी देखील आपल्या नृत्यकलेतून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर आई मुलगी परफेक्ट मॅचिंग ही अनोखी व विशेष आकर्षण असणारी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये आई व मुलगी यांची जोडी घेऊन त्यांना विशेष असे प्रश्न विचारण्यात आले. यानंतर दिवसभराच्या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
पाककला स्पर्धा :
प्रथम : तृप्ती हर्षद रेडिज.
द्वितीय : जयश्री नेताजी पाटील.
वैयक्तिक नृत्य स्पर्धा :
प्रथम क्रमांक विभागून :
पारिजा प्रथेमश गोविलकर आणि स्वानंदी स्वप्नील पातेरे.
हस्तकला स्पर्धा :
विजेती : स्वानंदी स्वप्नील पातेरे.
आई मुलगी परफेक्ट मॅचिंग स्पर्धा
विजेती जोडी :
आई : ज्योती उत्तम वेदांते.
मुलगी : भक्ती उत्तम वेदांते.
सर्व विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महिला दिनाच्या या कार्यक्रमाला महिला पालकांची उपस्थिती विशेष लक्षवेधक होती. सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. दिपाली कीर आणि श्रीम. पायल भोळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीम. स्नेहल भागवत यांनी केले. तसेच प्रशालेचा सर्व शिक्षकवृंद, सांस्कृतिक विभाग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपयुक्त असे सहकार्य लाभले.