(रत्नागिरी)
पाली येथील डी.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेमध्ये आज शासन निर्णयानुसार ‘आझादी का अमृतमहोत्सव’ यानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाअंतर्गत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रशालेकडून प्रभातफेरी काढण्यात आली. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. विविधतेमध्ये एकता दाखवणारी वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रभातफेरीचा मार्ग स्कूल मैदान ते पाली बाजारपेठ ते स्कूल असा होता. सदरच्या प्रभातफेरीसाठी पाली गावचे सरपंच श्री.विठ्ठल सावंत, उपसरपंच श्री. धाडवे, तसेच सर्व पोलिस पाटील उपस्थित होते. पोलिस दूरक्षेत्र पालीच्या श्रीम. स्वाती राणे मॅडम देखील सदरच्या प्रभात फेरीसाठी आवर्जून उपस्थित होत्या. सदरच्या प्रभात फेरीसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कांबळे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. प्रशालेचा सर्व सहकारी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.