(संगलट-खेड /इक्बाल जमादार)
चिपळूण येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात जिमखाना विभागातर्फे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डीवायएसपी श्री.राजेंद्रकुमार राजमाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डी. वाय. एस. पी.श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या हस्ते या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.मंगेश तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट उपस्थित होते.
यावेळी श्री.राजमाने यांनी विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले. खेळ आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.माधव बापट व डी वाय एस पी श्री राजमाने यांनी प्रत्यक्ष बॅडमिंटन खेळून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
या उद्घाटन प्रसंगी नियमक समिती सदस्य लियाकत दलवाई ,कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, पर्यवेक्षिका सौ.स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी, वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख प्रा. आर.एम.मोरे ,कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख प्रा. व्हा.पी. जोशी, क्रीडा शिक्षक उल्हास मोहिते ,प्रा.जीवन राज कांबळे ,प्रा.राम कदम आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ दिशा दाभोळकर यांनी केले. तर प्रा.सौ.तृप्ती यादव यांनी आभार मानले.