( नवी दिल्ली )
ट्विटर हे जगभरात वापरलं जाणारं डिजिटल माध्यम आहे. मात्र आता ट्विटरने युजर व्हेरिफिकेशन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरची मालकी सध्या एलन मस्क यांच्याकडे आहे. एलन मस्क यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “संपूर्ण व्हेरिफिकेशन प्रक्रिया सध्या सुधारित केली जात आहे.” ट्विटर युजर्सचं खातं व्हेरिफाइड करण्यासाठी आणि ब्लू टिक देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे.
अहवालानुसार, ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच, त्यांचं अकाउंट व्हेरिफाईड करण्यासाठी 4.99 डॉलर्स म्हणजेच, सुमारे 415 रुपये प्रति महिना भरावे लागण्याची शक्यता आहे.