(नवी दिल्ली)
जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि मंदीच्या भीतीमुळे, जगभरातील ७६० कंपन्यांनी गेल्या सहा महिन्यांत ५.३८ लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टेक कंपन्यांनी खर्च घटविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रिअल इस्टेट, दळणवळण, आर्थिक क्षेत्र, आरोग्यसेवा आणि ऊर्जा यासह इतर क्षेत्रांतही नोकरकपात झाल्याचे अहवालात समोर आले आहे. याचा सर्वात कमी फटका ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना बसला आहे.
ऊर्जा क्षेत्रात सहा महिन्यांत चार हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आले. स्वित्झर्लंडची सर्वात मोठी बँक यूएसबी देखील ३६,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. गेल्या सहा महिन्यांतील जागतिक स्तरावर ही सर्वात मोठी नोकरकपात असेल. – आर्थिक क्षेत्रातील एकूण संख्येच्या २९ टक्के प्रमाण आहे. यूबीएसने २०२७ पर्यंत आपला खर्च ८ अब्ज डॉलरने कमी करणार असल्याचे सांगितले होते.
बँक, ऊर्जा क्षेत्रात सर्वाधिक संख्या
फेडेक्स कंपनीन एकूण १२,००० कर्मचान्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रात नोकरकपातीचे हे प्रमाण चार टक्के आहे. मायक्रोसॉफ्टने ११,१२० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या संख्येनुसार हे प्रमाण पाच टक्के आहे. आयकेईएने १०,००० लोकांना बाहेर काढले असून या क्षेत्रातील एकूण कर्मचान्यांचे प्रमाण सहा टक्के आहे. आरोग्य क्षेत्रात फिलिप्सने १३ टक्के म्हणजेच १०,००० कर्मचान्यांना कामावरून काढले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सतत वाढणारी महागाई रोखण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदराच्या आघाडीवर कठोर भूमिका स्वीकारली. त्याचा थेट परिणाम जगभरातील अर्थव्यवस्था आणि कंपन्यांच्या कमाईवर झाला आहे. महसुलात घट होत असताना त्यांचा खर्च कमी करण्यासाठी आणि नफा स्थिर ठेवण्यासाठी कंपन्यांनी नोकरकपातीचा मार्ग स्वीकारला आहे.