[ नवी दिल्ली ]
आशिया चषक २०२२ या स्पर्धेनंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा आगामी महिन्यातील ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे, परंतु या स्पर्धेतून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे, तर दुसरीकडे दोन खेळाडूंनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे त्यांची जागा निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. या विश्वचषकासाठी त्यांचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो, परंतु दुखापतग्रस्त अष्टपैलू रवींद्र जडेजा आता वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये एका एडव्हेंचर अॅक्टिविटी करत असताना जडेजाला दुखापत झाली. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे जडेजाला एका वॉटर बेस्ट ट्रेनिंग अॅक्टिव्हिटीत सामील होण्यास सांगितलं गेलं. हॉटेलच्या आवारात असलेल्या बॅकवॉटर फॅसिलिटीत ही अॅक्टिव्हिटी करण्यात आली. जडेजाला स्की बोर्डवर स्वत:ला पाण्यात बॅलेंस करायचं होतं. ही एक ए़डव्हेंचर अॅक्टिव्हिटी होती. याच अॅक्टिव्हिटी दरम्यान रविंद्र जाडेजाचा पाय घसरला आणि त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली.
आता त्याचेवर यशस्वी शस्त्रक्रियादेखील झाली, मात्र या शस्त्रक्रियेतून जडेजा पूर्ण बरा होण्याची शक्यता कमी प्रमाणात वर्तवली जात आहे. त्यामुळे तो टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. हा भारतीय संघाला मोठा धक्का मानला जात असून यामुळे संघाची चिंता वाढणार आहे.