आपल्या देशात जर सर्वाधिक कुठल्या खेळाचा डंका वाजतो, तर तो खेळ आहे क्रिकेट ! त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट संघावर लोक अक्षरशः वेड्यासारखे प्रेम करतात. ज्या दिवशी टीम इंडियाचा क्रिकेट सामना असेल त्यादिवशी लोक आपल्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत मॅच अनुसार बदल करतात, जेणेकरुन आपल्या आवडीच्या टीम इंडियाचा खेळ त्यांना पाहता येईल. आज आपण बघणार आहोत की टीम इंडियातील आपल्या प्रमुख स्टार खेळाडू कुठपर्यंत शिकले आहेत.
१) हार्दिक पांड्या : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दररोज कुठल्यातरी कारणाने मीडियाच्या बातम्यांमध्ये चर्चेत असतो. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की हार्दिक पांड्याचे शिक्षण दहावीपर्यंत देखील झाले नाही. हार्दिकने ९ वी मधूनच शाळा सोडली. याचा खुलासा खुद्द हार्दिकने एका मुलाखतीत केला आहे. शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने हार्दिकला शाळा सोडावी लागली होती.
२) विराट कोहली : विरोधी गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा फलंदाज विराट कोहलीचीही गोष्ट यापेक्षा वेगळी नाही. टीम इंडियाचा कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीचे शिक्षण केवळ बारावी पास आहे. क्रिकेटवर लक्ष देण्याच्या कारणाने विराट आपले शिक्षण सुरु ठेऊ शकला नाही.
३) महेंद्रसिंग धोनी : महेंद्रसिंग धोनी टीम इंडीयाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा कर्णधार असल्याने धोनीचे जगभरात चाहते आहेत. परंतु आपल्याला माहित आहे का की दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच धोनीने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे क्रिकेट खेळत असतानाच धोनीने बारावी आणि नंतर बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले.
४) युवराज सिंग : सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम नावावर असणारा भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगने त्याचे बारावीचे शिक्षण हरियाणाच्या डीएव्ही स्कुलमधून पूर्ण केले.
५) शिखर धवन : टीम इंडियामध्ये गब्बर नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शिखर धवनने देखील बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. क्रिकेटमुळे त्याला पुढचे शिक्षण घेता आले नाही.