( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथे श्रीकृष्ण अनंत पाटील बुवा याच्या जादूटोणाच्या कारनाम्यानी जिल्ह्यात प्रकरण गाजलं होत. महिलांना अश्लील शिव्या आणि दैवी अवतार असल्याचे भासवून भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक करत होता. शेवटी त्याच्या या करणाम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाटीलबुवा हा आपल्या झरेवाडी येथील मठामध्ये दैवी चमत्कार करत असल्याचा दावा करत होता. पाटील बुवाचा व्हिडीओ सोशल मिडीवर व्हायरल होताच पोलिसांनी या घटनेची दखल घेत पाटीलबुवा व त्याचे अन्य 3 साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पाटील बुवा आणि त्याच्या 3 साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. श्रीकृष्ण अनंत पाटील, प्रशांत प्रभाकर पारकर, अनिल मारूती मयेकर व संदेश धोंडू पेडणेकर यांच्याविरूद्ध हा खटला न्यायालयात चालवण्यात येत आहे.
पाटीलबुवासह त्याच्या 3 साथीदारांविरूद्ध महाराष्ट्र जादुटोणाविरोधी कायद्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे याच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. साऱ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
काय आहे प्रकरण
पाटील बुवा याने ‘मी दैवी अवतार आहे, मी चमत्कार करू शकतो, मृत मुले जिवंत करू शकतो, डॉक्टरांचे ऐकू नका,’ अशा बाता मारून गरीब जनतेला लुबाडले. तसेच महिलांशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी 2017 साली गुन्हा दाखल केला होता.
पाटील बुवा हा पूर्वी पोलिस दलात कार्यरत असल्याने या घटनेमुळे पोलिस दलातही खळबळ उडाली होती. पाटील बुवाचे व्हिडिओ व्हायरल होताच राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीतर्फे पाटीलविरोधात मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. ए. दीक्षित यांनी पाटील याला सशर्त जमीन मंजूर केला. 30 डिसेंबर 2017 रोजी पाटील बुवाला रत्नागिरीच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने 50 हजार रुपयांचा सशर्त जमीन मंजूर केला.