वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत. मशिदीचे सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुस्लिम पक्षकारांनी उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक न्यायालयातील सुनावणी थांबवण्यास नकार दिला आहे. तसेच शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवण्याचे आदेश देतानाच मुस्लिम धर्मीयांनी नमाजापासून रोखू नयेत, असेही देश दिले आहेत.
- ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे ती जागा सुरक्षित ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- मुस्लीम धर्मीयांना नमाज अदा करण्यापासून रोखू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम धर्मीयांची बाजू मांडणाऱ्यांना समजवले की, सध्याची न्यायालयीन सुनावणी ही मशिदीच्या जागेवरील उपासनेसाठी आहे, मालकीसाठी नाही.
- न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निर्देश दिले की, जर शिवलिंग सापडले आहे तर आपल्याला संतुलन राखावे लागेल.
- आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सदर जागेचे रक्षण करण्याचे निर्देश देऊ, तसेच मुस्लिमांना नमाजपासून रोखू नये, असेही सांगू असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.