( खेड / इक्बाल जमादार )
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या ज्ञानदीप विद्या संकुल मधील 65 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण मिळवून NEET (वैद्यकीय राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यामध्ये उमेश पवनदास वैष्णव 658 /720 मिळवून प्रशालेत प्रथम, फराह उस्मान चौगले 597/720 मिळवून प्रशालेत द्वितीय, अनुजा संतोष चव्हाण 582/720 मिळवून प्रशालेत तृतीय, मरियम इर्षाद देसाई 533/720 मिळवून प्रशालेत चौथी आली आहे.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील मार्गदर्शक सर्वश्री कोटा पॅटर्नचे मार्गदर्शक डॉ. राहुल पंडित, भरत पटेल, मुंबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शक निकेष भार्गव, सतीश माने, संजय काशीद, साधना थोरात यांनी Biology विषयाचे मार्गदर्शन केले. तसेच Physics विषयासाठी सर्वश्री कोटा पॅटर्नचे मार्गदर्शक आशिष राजवाडे, सूर्यामोहन सिंग, निखील भोसले, राजेश किट्टद, अभिजीत शेळके, अश्विनी पाटील यांनी मार्गदर्शन केले. Chemistry विषयासाठी कोटा पॅटर्नचे मार्गदर्शक सोनू कुमार, विशाल रावानी, मकरंद दाबके, पंकज हालके, समीर वाझे, शिल्पा आग्रे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, संस्थापक सदस्य प्रकाश गुजराथी, भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.