(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे-बोरज येथे दि. ०६ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठ कोकण विभाग ४ मधील टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उदघाटन ज्ञानदीप महाविद्यालय सीडीसी आणि गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्री. दीपक लड्ढा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कोकण विभागाचे समन्वयक श्री. शशांक उपशेट्ये, कोकण विभाग उपसचिव प्रा. राम कदम, कोकण विभाग निवड समिती सदस्य डॉ. विनोद शिंदे, प्रा. डॉ. उमेशकुमार बगल तसेच ज्ञानदीप विद्यासंकुलातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये कोकण विभागातील महाविद्यालयांचे पुरुष व महिला संघ सहभागी झाले होते. यामध्ये पुरुष विभागामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी या संघाने प्रथम, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण या संघाने द्वितीय तर घरडा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. याबरोबरच महिला विभागामध्ये डीबीजे महाविद्यालय, चिपळूण या संघाने प्रथम, घरडा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी या संघाने द्वितीय तर ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अरविंद सुतार, प्रशांत कांबळे तसेच शुभम कांबळे यांनी काम पहिले.
या स्पर्धेमधून महाविद्यालयातील संगणक विभागामध्ये प्रथम वर्षामध्ये शिकत असलेली सामिया परकार, तृतीय वर्षामध्ये शिकत असलेली सलोनी खेडेकर तसेच ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शिकत असलेली हूमेरा वलेले या तिघींची रुईया कॉलेज, मुंबई येथे होणाऱ्या अंतर- विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढढा, संस्थेचे सर्व सभासद व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांचेकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले