(संगलट -खेड / इक्बाल जमादार )
खेड ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव उच्च माध्यमिक विभागातील वाणिज्य शाखेतील प्रा. चंद्रसेन घुंबरे यांनी Trends in Sex Ratio in Selected Districts in Maharashtra (1951 to 2011) या विषयात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल डॉ चंद्रसेन घुंबरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोकणचा स्त्री पुरुष दर हा कायमच अधिक असून त्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दर गेली 70 वर्ष अधिक आहे. आजपर्यंत अभ्यासामध्ये केवळ स्थलांतर हाच एक घटक यास जबाबदार मानला जात होता. पण या संशोधनाने असे सिध्द केले आहे कि, यावर आर्थिक व सामाजिक घटकांचाही तितकाच परीणाम होत आहे.
डॉ. घुंबरे सरांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.