(रत्नागिरी)
राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे हा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प पुर्नजिवीत होण्याची दाट हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या या ठिकाणी प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित केली गेली असून संरक्षण भिंत देखील उभारली गेली आहे. 9 हजार 900 मेगावॅट क्षमतेचा हा देशातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे.
वादात अडकलेल्या या मोठ्या प्रकल्पात न्यूक्लिअर रिऍक्टर बसवण्यास केंद्र सरकारनं तत्वत मंजूरी दिल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी राज्यसभेत देण्यात आली होती. त्यानंतर आता उद्या 26 मे रोजी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थळाची पाहणीसाठी फान्सहुन एक टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे. प्रकल्पस्थळाची पाहणी हा या भेटीचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले आहे.