(जैतापूर/ वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील जैतापूर चव्हाटावाडी येथील जगदीश चंद्रकांत करगुटकर यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. नोव्हेंबर 1983 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रत्नागिरी पोलीस दलामध्ये रुजू झालेल्या जगदीश करगुटकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी शहर, जिल्हा पोलीस मुख्यालय आधी ठिकाणी सेवा बजावली आहे. या सेवा काळात त्यांना पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा प्रकारच्या पदोन्नती मिळाल्यानंतर आता त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. सध्या ते रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात कार्यरत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करगुटकर यांना पोलीस पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची प्राप्त आली आहे. उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्यानंतर जैतापूर परिसरासह त्यांनी काम केलेल्या विविध तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.