(वॉशिंग्टन)
अंतराळात 2100 कोटी प्रकाशवर्ष दूर एक घनदाट आकाशगंगा आहे, जिच्या चारही बाजूंनी अस्ताव्यस्त प्रकाशपूंज आहे. अस्ताव्यस्त यासाठी कारण, हा प्रकाशपूंज नेहमीच एकसारख्या आकाराचा राहत नाही. तो फिरत आणि तुटत राहतो. यामुळेच त्याला आईनस्टाईनची अंगठी असे म्हटले जाते. ही एक रहस्यमय आकाशगंगा आहे.
आईनस्टाईन अंगठीचे वजन 6500 कोटी सूर्य सामावले जातील इतके आहे. हा पूंज आपल्या पृथ्वीपासून 1700 प्रकाशवर्ष दूर असून, त्याची आकाशगंगा त्याच्याही 400 प्रकाशवर्ष दूर आहे. आतापर्यंतच्या इतिहासात वैज्ञानिकांनी अंतराळातील ज्या वस्तूंचा शोध लावला आहे, त्या फार तर 1470 प्रकाशवर्ष दूर होत्या. यावेळी प्रथमच नासाच्या जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने अलिकडेच त्याचे छायाचित्र घेतले. विशेष म्हणजे, प्रथमच इतक्या दूर असलेल्या आईनस्टाईन अंगठीचे छायाचित्र घेण्यात आले आहे. याला आईनस्टाईनची अंगठी असे यासाठी संबोधले जाते. कारण सापेक्षवादाच्या सिद्धांतात आईनस्टाईनने त्याचा शोध लावला होता. या आईनस्टाईन अंगठीची गुरुत्वाकर्षण शक्ती फार जास्त आहे. असे तेव्हाच होते, जेव्हा एखादी आकाशगंगा किंवा कृष्णविवर आपल्या सभोवतालची अंतराळ वेळ स्वत:च्या नियंत्रणात करते. त्यातून जो प्रकाश बाहेर पडतो, तो चारही बाजूंनी एक वर्तुळाकार आकृती तयार करीत असतो.
अंगठीजवळ जाणारी प्रत्येक वस्तू अस्ताव्यस्त होते
हा (Einstein’s Ring) प्रकाशपूंज त्याच्या जवळपास असलेल्या अन्य आकाशगंगा, सुपरनोव्हा आणि अन्य वस्तू आपल्याकडे ओढते. त्यामुळे त्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत असतात. या प्रकाशपूंजची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी जबरदस्त आहे की, त्यामुळे तिथून जाणार्या प्रत्येक वस्तूचा आकार बदलत असतो.
असे द़ृश्य क्वचितच दिसते
साधारणपणे अशा प्रकारच्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षण असलेल्या वस्तूंच्या आसपासच्या अंतराळात अर्धचंद्राकार प्रकाशलेल्या आकृती किंवा अर्धवट प्रकाशपूंज दिसतात. मात्र, परिपूर्ण आईनस्टाईन अंगठी दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अंतराळातील हे द़ृश्य दुर्लभ असेच आहे.