(नवी दिल्ली)
जी-२० शिखर परिषदेसाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात दाखल झाले आहेत. आज आणि उद्या होणा-या या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी काल सकाळपासून दिल्लीच्या विमानतळावर हजेरी लावायला सुरुवात केली. प्रत्येक नेत्याचे स्वागत भारतीय मंत्र्यांकडून करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधआन ऋषी सुनक, जपानच्या पंतप्रधान फुमियो किशिदा, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्यासह अनेक विदेशी नेते राजधानी दिल्लीत दाखल झाले आणि त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. बायडेन भारतात येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेबाबत ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ”9-10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी भारत उत्साहित आहे. भारत पहिल्यांदाच G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. येत्या 2 दिवसांत जागतिक नेत्यांशी सकारात्मक चर्चा होण्याची मला खात्री आहे. मी अनेक जागतिक नेते आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेईन, जेणेकरून ही मैत्री आणि सहकार्य आणखी घट्ट करता येईल.”
मोदींनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ”G20 शिखर परिषदेदरम्यान मी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या विषयावरील सत्राचे अध्यक्षपद करेन. यादरम्यान जागतिक समुदायाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. मजबूत, शाश्वत, सर्वसमावेशक आणि संतुलित विकासाचा पाठपुरावा करण्यावरही चर्चा होईल. आम्ही तांत्रिक बदल आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसारख्या भविष्यातील क्षेत्रांना उच्च प्राधान्य देतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, ”राष्ट्रपती 9 सप्टेंबर रोजी परदेशी पाहुण्यांसाठी डिनरचे आयोजन करतील. 10 सप्टेंबर रोजी राजघाटावर जागतिक नेते गांधीजींना आदरांजली वाहतील. त्याच दिवशी समारोप समारंभात, G20 नेते निरोगी ‘एक पृथ्वी’साठी ‘एक कुटुंब’ म्हणून एकत्र राहून शाश्वत आणि न्याय्य ‘एक भविष्य’साठी त्यांचा सामूहिक दृष्टीकोन सांगतील.
India also places great emphasis on a human-centric way of furthering progress. It is important to emulate Gandhi Ji’s mission of serving the underprivileged, the very last person in the queue.
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2023
ऐतिहासिक जी-२० परिषदेसाठी विदेशातील जवळपास ५०० नेते उपस्थित झाले आहेत. शिखर परिषदेसाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांचे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी स्वागत केले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा काल दुपारी दिल्लीमध्ये दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांचेही जंगी स्वागत करण्यात आले.
यासोबतच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलेनी, अरजेंटियाचे अध्यक्ष अल्बर्ट फर्नाडझ, आफ्रिकन संघाचे प्रमुख अझली असायुमानी, युरोपीयन युनियनच्या अध्यक्ष व्रुसुला वोन डेर लायेन, आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा, युरोपियन कॉन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिचेल, डब्ल्यूटीओ कार्यकारी प्रमुख नगोझी ओकनजो-इवेला, मॅक्सिकोच्या अर्थमंत्री रकेल बुईनरोस्ट्रो सानजेझ, ओईसीडी प्रमुख सचिव मॅथिस कोरमनही दाखल झाले आहेत.
मंत्री, अधिका-यांसह बायडेन दाखल
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिका-यांंसोबत दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जनरल व्ही. के. सिंह बायडेन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अत्याधुनिक अशा कारमधून ते आपल्या हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. अमेरिकेन प्रतिनिधींसाठी ५०० खोल्या बूक करण्यात आल्याची माहिती आहे.
शिखर बैठक भारत मंडपम येथे
दिल्लीत होणारी जी-२० शिखर बैठक भारत मंडपम इथे होणार आहे. हे फूङ्मस्र असोसिएट्सने सिंगापूरस्थित कंपनी एडासच्या सहकार्याने बनवलं आहे. भारत मंडपम इतका मोठा आहे की त्यात २६ फुटबॉल स्टेडियम आरामात सामावून घेऊ शकतात. भारत मंडपमचे एकूण बजेट सुमारे २,७०० कोटी रुपये आहे. इथे बांधण्यात आलेल्या समिट हॉलसाठी झेक प्रजासत्ताकातून एक मोठा झुंबर खास खरेदी करण्यात आला आहे. भारत मंडपमचा आकार इतका मोठा आहे की त्यात २६ फुटबॉल स्टेडिअम आरामात सामावू शकतात. हे भारतातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर देखील आहे.
भारत मंडपम हे नाव भगवान बसवेश्वरांच्या ‘अनुभव मंडपम’ वरून प्रेरित आहे. अनुभव मंडपम म्हणजे वादविवाद आणि अभिव्यक्तीची लोकशाही पद्धत. भारत मंडपमची रचना आरकॉप असोसिएट्सचे आर्किटेक्ट संजय सिंग यांनी सिंगापूरस्थित फर्म एडासच्या सहकार्याने केली आहे.
हे भारतीय परंपरेशी निगडित आधुनिक केंद्र आहे. भारत मंडपमचं एकूण क्षेत्रफळ १२३ एकर म्हणजे सुमारे ४० लाख चौरस फूट आहे. त्याचं बांधकाम ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू झालं. २६ जुलै २०२३ रोजी पंतप्रधान मोदींनी त्याचं उद्घाटन केले.