( मकरंद सुर्वे / संगमेश्वर )
जीवनात जेवढ्या अडचणी जास्त, तेवढा मनुष्य प्रगती करतो, धडपड करत असतो म्हणून समस्याच माणसाला घडवतात असे प्रतिपादन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले. ते माखजन इंग्लिश स्कूल येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.हा सोहळा संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर संगमेश्वर लांजा मतदार संघाचे माजी आमदार सुभाष बने,परशुराम युवा मंचाचे अध्यक्ष प्रसन्न बापट ,संस्था उपाध्यक्ष मनोज शिंदे आदी उपस्थित होते.
श्री कुलकर्णी पुढे म्हणाले की स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी जिंकले त्यांचे कौतुक आहेच. पण उपविजेत्यांनी खचून न जाता अधिक जोमाने मेहनत करा असा सल्ला दिला.जीवनात समस्या आल्या म्हणून कुणी हार मानू नका.प्रयत्न चालू ठेवा,एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असे नमूद केले.
दरम्यान आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉन प्रकारात,१७ वर्षाखालील मुलींच्या २ किलोमीटर अंतरासाठी सुदिक्षा पडये,प्रथम ,माखजन कॉलेज,स्वरा गुरव द्वितीय माखजन कॉलेज,तृप्ती शिगवण तृतीय,माखजन कॉलेज तर मुलग्यांमध्ये श्रेयस ओकटे प्रथम,शिवर्तन अकॅडमी, सुयश भागडे द्वितीय,माखजन कॉलेज,सुरज भुवड तृतीय माखजन कॉलेज यांनी क्रमांक पटकावला.१९ वर्षाखालील ३ किलोमीटर अंतरासाठी,मुलींमध्ये श्रद्धा कवळकर प्रथम,माखजन कॉलेज,सज्ञाली सुर्वे द्वितीय माखजन कॉलेज,सायली फणसे तृतीय माखजन कॉलेज.
१७ ते ३५ वयोगटातील ५ किलोमीटर अंतरासाठी झालेल्या खुल्या मॅरेथॉन मध्ये दिपेश जाधव प्रथम,मंगेश शिंदे द्वितीय,प्रदीप गुरव तृतीय क्रमांक पटकावला.प्राथमिक गटात १० वर्षाखालील, ६०मीटर अंतरासाठी मुलींच्या गटात प्रिया रामाणे, धामापूर नं३ प्रथम,आराध्या चव्हाण कळंबुशी नं १ द्वितीय, वेदा भुवड आरवली नं १तृतीय,तर मुलग्यांच्या गटात पदार्थ रांबाडे आरवली नं १ प्रथम,सिद्धेश भुवड आरवली नं १ द्वितीय ,तर गंधर्व कवळकर,माखजन इंग्लिश मिडीयम तृतीय क्रमांक मिळवला.१२० मीटर व १३ वर्षाखालील प्रकारात,मुलींमध्ये प्राची हेमण माखजन हायस्कुल प्रथम,कृतिका गोताड,माखजन हायस्कुल,द्वितीय,जागृती गावडे करजुवे हायस्कुल तृतीय क्रमांक मिळवला तर मुलग्यांमध्ये यतीराज बाचीम प्रथम,करजुवे हायस्कुल,शुभम शिगवण ,द्वितीय माखजन हायस्कुल,वेदांत भुवड तृतीय माखजन इंग्लिश मिडीयम यांनी मिळवला.सर्वांना रोख रक्कम,मेडल,प्रमाणपत्र,व गिफ्ट हाम्पर देऊन गौरविण्यात आले.
कबड्डी प्रकारात १ ली ते ५ वी च्या गटात मुलींच्या गटात आंबव पोंक्षे शाळा विजेती तर आरवली शाळा नं १ उपविजेती ठरली.मुलग्यांच्या संघात माखजन मराठी शाळा विजेती तर बुरंबाड नं २ उपविजेती ठरली.६वी ते ७वी ,१४ वर्षाखालील गटात मुलींच्या संघात आरवली नं १ प्रथम,तर माखजन हायस्कुल द्वितीय तर मुलग्यांच्या गटात आरवली शाळा नं १ विजेता तर आंबव पोंक्षे शाळेचा संघ उपविजेता ठरला.
१९ वर्षाखालील गटात मुलींच्या संघात नायशी हायस्कुल,ज्यू कॉलेजचा संघ विजेता तर ऍड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.तर मुलग्यांच्या गटात श्री देव केदारनाथ ज्यू.कॉलेज संघ विजेता तर ऍड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. सगळ्या संघाना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, चषक, देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान बक्षीस वितरण सोहळ्यावेळी माखजन हायस्कुल मधील विद्यार्थ्यांनी मल्लखांबा वरील प्रात्यक्षिके,व योगासने सादर करून मान्यवरांची मने जिंकली.यावेळी विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत,ईशस्तवन स्वागतगीत सादर केले.
दरम्यान यावेळी माजी आमदार सुभाष बने, कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद साठे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला सचिव राजेश फणसे,संदेश पोंक्षे, विनायक केळकर, सतीश साठे, शंकर भुवर अनिल मोरे, बाबू मोरे, सचिन चव्हाण, तुकाराम मेस्त्री, जयंत मालशे, पोलीस निरीक्षक उदय झावरे, स्नेहसंमेलन प्रमुख महादेव शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल कवळकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी ज्ञानद धामणस्कर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी केले.सूत्रसंचालन आदित्य सरदेसाई यांनी केले तर आभार इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका सौ धनश्री भोसले ह्यांनी केले.