(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील खारीपट्ट्या विभागातील जि.प.प्रा.डिजिटल शाळा पन्हाळजे सुतार-बौद्ध या शाळेचा विद्यार्थी अजिंक्य सुनील शिगवण हा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये 228 गुण मिळवून पन्हाळजे केंद्रामध्ये पहिला कर्जी विभागातूनमध्ये तिसरा आणि खेड तालुक्यांमध्ये बारावा येऊन रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये मेरिटमध्ये आला आहे. या शाळेचा पहिला विद्यार्थी मेरीट लिस्टमध्ये येण्याचा मान मिळवला आहे.
शाळेचे आणि गावाचे नाव उंचावल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री वारे, श्रीम. कडू मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माता पालक संघ तसेच विद्यार्थी पालक सुनिल शिगवण, सुजाता शिगवण, देवेंद्र शिगवण, वासंती शिगवण, तसेच शिगवण वाडी ग्रामस्थ व महिला मंडळ, तसेच समाज सेवक श्री. राजेंद्र भुवड यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.