(खवटी / राजेंद्र दळवी)
खेड तालुक्यातील जि.प.केंद्रीय शाळा खवटी नं. शाळेला सन 2019-20 रोजी दोन वर्ग खोल्या मंजूर झाल्या होत्या. मात्र सदर इमारतीचे रॅम्पचे काम अपूर्ण होते. ग्रामपंचायत खवटी तसेच ग्रामस्थ खवटी यांच्या माध्यमातून सदर इमारतीच्या रॅम्पचे काम पूर्ण करण्यात आले. विदयार्थी बसण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती इमारत विद्यार्थी बसण्यासाठी धोकादायक असल्यामुळे केंद्रीय शाळा खवटी नं 1ची शाळा व्यवस्थापन समिती यांनी ठराव करून तसेच ग्रामपंचायत खवटी तसेच, खवटी गावचे ग्रामस्थ यांनी नवीन इमारतीचे उदघाटन करून विद्यार्थ्यांना नवीन इमारतीमध्ये बसण्याची व्यवस्था केली.
मोठया उत्साहात ग्रामपंचायत खवटीच्या सरपंच सौ.शर्मिला दळवी यांच्या हस्ते इमारतीचे उदघाटन करण्यात आले. तसेच उपसरपंच शैलेश दळवी यांच्या हस्ते व अध्यक्ष कृष्णा मांडवकर यांच्या हस्ते फित कापण्यात आली. सदर कार्यक्रमास खवटी गावचे पोलीस पाटील मनोहर दळवी, अमोल दळवी, तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप वालणकर, ग्रा.पं.सदस्या मानसी पाटील, सुरेखा बुरटे, माजी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष चंद्रकांत दळवी, विशाल दळवी, अविनाश वाडेकर, शिवाजी शिंदे, पत्रकार राजेंद्र दळवी, मन्सूर भाई, मुख्याध्यापक मानसी पेंडखलकर, उपशिक्षक राजेंद्र क्षिरसागर, ग्रामस्थ एकनाथ दळवी, नानाबुवा दळवी, दत्ताराम दळवी, नितीन दळवी, सुनील दळवी, अनंत दळवी तसेच सर्व पालक उपस्थित होते.