(राजापूर)
रत्नागिरी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कशेळी नं.२ येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळेमध्ये विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या सर्वांचा समावेश होता.
सहशालेय उपक्रमाच्या आयोजनाबाबत व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री. दिलीप आगवेकर तसेच सर्व सदस्य मुख्याध्यापक सौ.ज्योती मुरकर, शिक्षक सौ.संध्यारानी घुणके यांनी केले. श्री.सोमनाथ कदम आणि सौ.पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले.