तेजा मुळ्ये, रत्नागिरी
आपल्या सर्वांच्या आयुष्यात महामारीने आमूलाग्र बदल झाले आणि होत आहेत मग उच्च शिक्षित असोत नाहीतर धनाढ्य व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार कोणीही चुकला नाही पण शेतकरी हा एकमेव घटक असा राहिला की त्याच्या कामाच्या पद्धतीत ना बदल झाला,, ना त्याच्या राहणीमानात कारण त्याचं काम निसर्ग आणि अंगमेहेनतीचं,,, डोंगरउतरणीला असलेल्या आपल्या शेतात या वर्षी नवीन शेतीचा प्रयोग करावा का ? यावर दोघं चर्चा करीत आहेत. मुलीचं लग्न झालं. ती संसाराला लागली. घारीची नजर लक्ष्यावर असते तशी कारभरणीची नजर घराकडं,,, मुलीच्या काळजीने असायची आता ती चिंता सरली.
आपल्या शेतात वेळेवारी पेरणी झालीय, लावणी करायची आणि यावर्षीला निर्धोक वारीला जाऊन माउलीला भेटायचं! असा विचार चाललाय. किती शान्त आणि आनंदी जोडपं बसलंय. आत्तापर्यंत काबाडकष्ट केले , आता फुरसत मिळाली आणि शिवारातल्या वाऱ्याचा आनंद घेत काम आटोपून बसण्याचा योग आला. डोंगर उतारणीची कलमे आता आंबे देऊन आराम करताहेत. काही शेत दळ्यांमध्ये दाढ वाढू लागली, पावसाने आरंभ केला पण आता उसंत घेतली आहे. पुन्हा पावसाने उसळी घेतली की जोत जोडायला हवं. नांगरणी करायला हवी,,,
डोळ्यात फुल पडलेलं वेळीच लक्षात आलं आणि कारभाऱ्याने बायकोच्या डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं. आता नव्या नजरेनं माऊलीचं दर्शन घ्यायचं, किती छान विचार झाला,,,हे समाधान चेहऱ्यावर उन्हाची तिरीप झळकावी तसं झळकतं आहे! ,,,,