(रत्नागिरी)
महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेत पात्र शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ही योजना सुरु असून या अंतर्गत २० जानेवारी २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण १३२ जणांना सौर कृषी पंपाची जोडणी प्राप्त झाली आहे.
या काळात एकूण ऑनलाईन पोर्टलद्वारे ४९३ जणांनी अर्ज केला होता. यातील २२३ जण पात्र ठरले होते. १९० जणांना कंत्राटदार नियुक्त झाला आणि त्यातील १३२ जणांना सौर कृषी पंपाची जोडणी प्राप्त झाली. या पंपाची सुरु झाल्यापासूनची ५ वर्षे देखरेख ही कंत्राटदाराद्वारा होते. त्यानंतरची देखरेख ही लाभार्थ्याला करावी लागते. राज्य शासनाच्यावतीने अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर करण्यात आली आहेत. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.