(पाली)
रत्नागिरी वनपरिक्षेत्रा मार्फत राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख या तालुक्यातील विविध ठिकाणी मालकी क्षेत्रातील पाणस्थळावरती वन्यप्राणी प्रगणना केली जात आहे. प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमा या दिवशी ही वन्य प्राणी प्रगणना केली जाते.
त्याप्रमाणे विभागीय वनाधिकारी रत्नागिरी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक वैभव बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार हे सदानंद घाडगे वनपाल राजापूर, दिलीप आरेकर वनपाल लांजा, तौफिक मुल्ला वनपाल देवरुख, न्हानू गावडे वनपाल पाली यांचेबरोबर स्थानिक लोक व वन्य प्राणी प्रेमी यांना सोबत घेऊन पाणस्थळा जवळील तयार केलेल्या कृत्रिम मचानावर बसून पाणस्थळावरील प्रगणना केली आहे. यामध्ये पाणवठ्यावर येणाऱ्या सर्व वन्यप्राणी च्या नोंदी केल्या आहेत.