(रत्नागिरी)
रविवारआज दिनांक ०६/०८/२०२३ रोजी महा. राज्य जि प आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी केंद्रीय राज्यकारणी अध्यक्ष माहेशजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवडण्यात आली. अध्यक्ष श्री. परशुराम निवेंडकर, कार्याध्यक्ष श्रीम.मंगला पराडके, मदन जानवलकर, उपाध्यक्ष श्री.विजय मालगुंडकर, श्रीम. अक्षदा पाटणकर, सचिव श्री. दिपक गोरीवले, सहसचिव अभिजित मोडसिंग, कोषाध्यक्ष श्री.विनोद जाधव, सहकोषध्यक्ष श्री विवेक गावडे, जिल्हा संघटक मंडणगड श्री राजेंद्र जाधव,जिल्हा संघटक दापोली अभिजित गोरोले, जिल्हा संघटक अभय देसाई, जिल्हा संघटक चिपळूण भरत गांधी, श्रीम आशा खामगावकर, जिल्हा संघटक गुहागर श्री वैभव जाधव, जिल्हा संघटक रत्नागिरी श्री शैलेश वाघाटे, जिल्हा सल्लागार श्री. श्रीशंकरजी केतकर व श्री. नारेशजी ईदाते राज्य सदस्य श्री गजानन साळुंखे, श्री. प्रवीण बेलोसे यांची यावेळी निवड करण्यात आली.
यावेळी नूतन अध्यक्ष श्री परशुराम निवेंडकर यांनी संघटनेला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांना घेऊन काम करणार असे आश्वासन दिले. या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.