(रत्नागिरी)
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटाना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी तर्फे जिल्ह्यातील विविध शाळा, संघटना व संस्थेच्या माध्यमातून विविधखेळाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.या शिबिरामध्ये जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, अथलेटिक्स, व्हॉलीबॉल, धनुर्विद्या इत्यादी अनेक खेळांचा समावेश आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषदरत्नागिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व विविध खेळ संघटनायांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध खेळांचे उन्हाळीक्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात येत आहे.
प्रशिक्षण शिबिरा बाबत सविस्तरमहिती.
1.जिमनॅस्टिक :- दिनांक 10 मे ते 30 मे 2022. वयोगट – ६ ते १४ वर्ष मुले/मुली, वेळ – सकाळी 7.00 ते 9.00 व सायंकाळी 4.30 ते 6.30, स्थळ – श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल. संपर्क – श्री सचिन मांडवकर राज्य क्रीडा मार्गदर्शक (8408865870)
2. फुटबॉल – दिनांक 27 एप्रिल ते 4 मे 2022, वयोगट – ८ ते १६ वर्ष मुले/मुली,वेळ सायंकाळी 4.३0 ते 6.३0 स्थळ – श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल. संपर्क – श्री परांजपे (९९२०६७४३०६) व श्री मंगेश जाधव (८२७५४४८९४५)
3. व्हॉलीबॉल – दिनांक 27 एप्रिल ते 4 मे 2022, वेळ- सायंकाळी 4.30 ते 6.30 स्थळ – सह्याद्री शिक्षण संस्थेचे व्हॉलीबॉल मैदान. प्राशिक्षक- श्री सुहास अडनाईक (९८६०८७१२१२)
4. धनुर्विद्या – दिनांक 27 एप्रिल ते 4 मे 2022, वयोगट – ८ ते १६ वर्ष मुले/मुली,वेळ- सायंकाळी 4.30 ते 6.30 स्थळ – श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल. दिनांक. संपर्क – श्री मयांक गोडसे, प्रशिक्षक (84४६२६३४३८)
५. अॅथलेटिक्स- दिनांक 27 एप्रिल ते 4 मे 2022, वयोगट – ८ ते १६ वर्ष मुले/मुली, वेळ सकाळी६.३0 ते ७.३0 स्थळ – श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल. संपर्क – श्री अविनाश पवार (८२४७६३५५३३) व श्री मंगेश जाधव (८२७५४४८९४५